प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर २ एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे.
🟠०२१०३ विशेष गाडी-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०२.१२.२०२३ रोजी (शनिवार) सकाळी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता पोहोचेल.
➡️थांबे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर.
➡️संरचना: १७ डब्बे – एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.
🟠०२१०५ एकेरी विशेष गाडी-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. ०३.१२.२०२३ रोजी (रविवार) ००.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.
➡️थांबे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी आणि सोलापूर.
➡️संरचना: १७ डब्बे – एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.
🟠आरक्षण: ०२१०३ आणि ०२१०५ वन-वे स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग दि. ३०.११.२०२३ रोजी सर्व पीआरएस (PRS) स्थानांवर आणि http://irctc.co.in संकेतस्थळावर उघडेल.